कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत व परिसरात मोटर सायकली चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या विशेष पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तिघेही दुचाकी चोर हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक संजय जाधव यांना गोपनीय बातमीदार मिळालेल्या माहितीनुसार, पलूस येथील मोटरसायकल चोरांनी कृष्णा हॉस्पिटल समोरून बऱ्याच मोटरसायकली चोरी करून विटा खानापूर येथे विकलेल्या आहेत. या अनुषंगाने कराड शहर पोलीस ठाणे अंमलदार पोलीस हवालदार जयसिंग राजगे, पोलीस नाईक तानाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मारुती लाटणे यांचे विशेष पथक तयार करून अधिक तपास केला असता.
गुन्ह्यात प्रदीप तानाजी सोमोशी (वय- 24 रा. आमनापूर रोड पलूस कॅनल जवळ), राजु रामचंद्र जाधव (वय- 23, रा. भारती विद्यापीठ शेजारी पलूस), प्रशांत वसंतराव जाधव (वय -35, रा. सांगडेवाडी, तिघेही ता. पलूस, जि. सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील तीन आरोपींनी कराड, बहे -बोरगाव आरग बेडग अशा विविध ठिकाणाहून मोटरसायकली चोरून केल्याचे निष्पन्न झालेले आहे. नमूद गुन्ह्याचा तपास अनुषंगाने तीन आरोपींना यांना शोध घेऊन अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि विजय गोडसे यांनी तपास करून एकूण ११ मोटरसायकली चोरीच्या जप्त केल्या आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. रणजीत पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख विजय गोडसे, सहाय्यक फाैजदार निरीक्षक सतीश जाधव, पोलीस हवालदार नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, तानाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मारुती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा