टीईटी परीक्षा घोटाळा : बंगळुरातून आश्विन कुमार तर बीडमधून संजय सानपला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडा आणि टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. टीईटी पेपर फुटी प्रकरणी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपे याचेही काल निलंबन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवीत बीडमधून आणखी संजय सानप तर बंगळूर येथून जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला अटक केली आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली असून पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर जाऊन हि कारवाई केली आहे. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता. सुखदेव डेरे हे औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष होते. दरम्यान पोलिसांनी डेरे यांना अटक केली आहे. तर दुसरा आरोपी असलेल्या अजय सानप यांच्यावरही अटकेची कारवाई पोलिसांनी केली असून टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी संजय शाहूराव सानप (40 रा. वडझरी, ता.पाटोदा, जिल्हा बीड ) याला बीड मधून अटक केली आहे.

टीईटी व म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील आरोपी असलेल्या तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकजणाला अटक करण्यात आलेली आहे. म्हाडा पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्रीतिश देशमुखच्या चौकशीतून टीईटी परीक्षेचा घोळ समोर आला. त्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती.

छापामारीत सापडली कोटीची रक्कम

सुपेच्या चौकशीनंतर पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना 88 लाख रोख आणि सोने तसेच 89 लाखांचा ऐवज जप्त केला होता. पोलिसांनी सोमवारी आणखी एकदा छापा टाकून 1 कोटी 59 लाखांची रोकड आणि 70 लाखांचं सोने जप्त करण्यात आलेले आहे. पोलिसांच्या या कारवाईची चर्चा राज्यात सध्या सुरु आहे.