Satara News : पोलिसाची होमगार्डला मारहाण; “तुझ्या बापाचा नोकर आहे का” म्हणत कानशिलात लगावली ( Video)

Police Beat Home Guard
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
तुझ्या बापाचा नोकर आहे का? असे म्हणत चक्क एका पोलिसानेच होमगार्डला मारहाण केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील ही घटना असून याबाबतचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. या घटनेने गृहरक्षक दलात प्रचंड नाराजी असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्या विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करूनही कोणतीच कारवाई केली जात नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

प्रशांत पतंग देशमुख सनद नंबर 8817 असे सदर मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव आहे. तर ज्या पोलीस हवालदाराने त्याला मारहाण केली त्याचे नाव रजपूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामावर उशिरा आल्याच्या कारणावरून होमगार्डला मारहाण करण्यात आली असल्याचे समजत आहे. याबाबतचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. जाग्यावरून हलायचा नाही, तुझ्या बापाचा नोकर आहे का ? असं पोलीस हवालदार यामध्ये म्हणताना दिसत आहे. त्यानंतर होमगार्ड सुद्धा त्यांना उलट उत्तरे देत आहे. दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी झालेली पहायला मिळत आहे.

याबाबत होमगार्ड प्रशांत देशमुख यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की 21 मार्च रोजी सकाळी त्यांना तासवडे टोल नाक्यावर नेमणूक होती. त्या ठिकाणी जायला वाहन न मिळाल्यामुळे कर्तव्यावर पोहोचण्यास त्यांना उशीर झाला मात्र वेळेत न पोचल्यामुळे हवालदार रजपूत याने होमगार्ड प्रशांत देशमुख यांना अर्वाच भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केली आणि कानाखाली लावली. या प्रकाराने गृहरक्षक दलामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे .