हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये पोलीस विभागात मेगा भरती (Police Bharti 2024) करण्यात येणार आहे. कारण आता पोलीस भरती 100 टक्के करण्यासाठी वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17 हजार 471 रिक्त पदे भरण्यात येतील. या भरती प्रक्रियेमुळे राज्यांतील 17 हजार 471 तरुणांच्या हाती रोजगार येणार आहे.
3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती (Police Bharti 2024)
मधल्या काळामध्ये शिंदे फडणवीस सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती (Police Bharti 2024) करण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळी, रमजान नवरात्र उत्सव अशा सणावारांच्या काळामध्ये मुंबई पोलिसांवर कामाचा जास्त भर येतो. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी पोलिसांची कंत्राटी भरती करण्यात यावी असा सरकारने निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार होती. या भरती प्रक्रियेत राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा विचार गृहखात्याने केला होता.
भरती करण्यात येणाऱ्या जवानांना मुंबई पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊन त्यांना 11 महिन्यांसाठी पोलीस विभागात घेण्यात येणार होते. पण या निर्णयाला विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र विरोध केला. मुंबई सारख्या शहरांची जबाबदारी कंत्राटी पोलिसांवर देणे योग्य आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. राज्य सरकारमध्ये कंत्राटी भरती प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता वित्त विभागाने पोलीस भरती (Police Bharti 2024) 100 टक्के करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी मेगा भरती करण्यात येणार आहे.