हिंगोली ( रवींद्र पवार ) | Police Case : वसमत तालुक्यातील रांजोना शिवारात तीन दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी पोलिस कर्मचारी रमाकांत सदावर्ते यांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दि. 31 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी रमाकांत सदावर्ते हे आज सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर कळमनुरी येथून परभणीकडे समन्स बजावण्यासाठी जात होते. त्यांचे दुचाकी वाहन रांजोना शिवारात आले असतांना तीन दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी त्यांच्या दुचाकीला धक्का मारून खाली पाडले अन त्यानंतर त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सदावर्ते यांना काहीही करता आले नाही. या मारहाणीनंतर हल्लोखोर पळून गेले. Police Case
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक किशोर कांबळे, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे,जमादार राजू ठाकूर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदावर्ते यांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. Police Case
प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याचा संशय
यामध्ये कर्मचारी सदावर्ते यांना प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामध्ये रांजोना येथील दोघे जण तर इतर चौघे जण अनोळखी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांच्या जबाबावरूनच मारहाणीचे कारण स्पष्ट होणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
हे पण वाचा :
‘मुळशी पॅटर्न’ पाहिलाय का? बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही… : देवेंद्र फडणवीस
आता सगळे मरणार… ; माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुलांचे वादग्रस्त विधान
केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद
केंद्र सरकारच्या योजनांमध्ये राज्याचाही मोठा वाटा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान