व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

काही दिवसांमध्ये सुप्रियाताई पहिल्या महिला मुख्यमंत्री तर संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होतील…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच तुळजापूर दौऱ्यावर असताना तुळजा भवानी मातेकडे साकडे घातले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे असे म्हंटले. तर त्यांच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. दोघांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी निशाणा साधला आहे. “पुढच्या काही दिवसांमध्ये सुप्रियाताई या पहिल्या महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होतायत की काय,असे चित्र आता पाहणे महाराष्ट्रात बाकी आहे,” असा टोला काळेंनी लगावला आहे.

गजानन काळे यांनी ट्विट केले असून त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानावरून भविष्यात त्यांना सेनेचा मुख्यमंत्री नको असे चित्र दिसत आहे. गजानन किर्तीकर, खासदार संजय जाधव, श्रीकांत शिंदे व इतर सेना नेते राष्ट्रवादीबद्दल उघड नाराजी बोलून दाखवू लागले आहेत. लाचार संजय राऊत तरी राष्ट्रवादीची तळी उचलण्यात मग्न आहेत. लाचारसेना, असे ट्विट काळे यांनी केले आहे.

दरम्यान, त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला असून त्यांनी म्हंटले आहे की, विश्वप्रवक्ते संजय राऊत म्हणतात की पुढची 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर काल परवाच तुळजाभवानीला जाऊन सुप्रियाताई म्हणतात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे मी नवस फेडायला येईल. इतर सर्व नेते ज्या पद्धतीने राष्ट्रवादी इतर आमदार खासदार आणि शिवसैनिकांची कोंडी करतेय त्याबद्दल उघड नाराजी बोलून दाखवली. तरी सुद्धा ज्या विश्व प्रवक्त्यांना मनसेच्या कोंडीची काळजी आहे त्या संजय राऊतांना शिवसेनेची कोंडी राष्ट्रवादीकडून होतेय हे पहावत नाहीय की काय?, असे सवाल काळेंनी केला आहे.