औरंगाबाद : सेंट्रल नका येथे उभ्या असलेल्या मनपाच्या वाहनाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तरुणाला जिन्सी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. शेख अमीर शेख इब्राहिम वय 21, रा. बायजीपुरा असे आरोपीचे नाव आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदानदाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी रविवारी दिले.
मानपाचे कर्मचारी शेख आहेमद शेख रज्जाक रा. हर्षनगर हे 24 जुलै रोजी सेंट्रलनाका येते ड्युटीवर असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक तरुण मानपाच्या वाहणाची एम एच 20 सीटी 2358 बॅटरी कडून पळून जाताना दिसला. तेव्हा शेख आहेमद आणि वॉचमेन दिलीप जाधव या दोघांनी त्याचा पाठलाग केला. आरोपी हा दुचाकीवर पळून जाण्याचा प्रयत्नात होता, मात्र दुचाकी सुरू न झाल्याने आहमेद शेख यांनी त्याला पकडले. ही माहिती वरिष्ठांना दिली. या पहिले देखी 2 वाहणाच्या बेटऱ्या चोरीला गेल्या आहेत, त्या बॅटऱ्या ही आरोपीनेच चोरल्याचा संशय असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्याने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला काल न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील अमेर काजी यांनी युक्तिवाद केला. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून यापूर्वी सोडलेल्या बॅटऱ्या जप्त करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाकडे केली.