चंद्रपूर प्रतिनिधी | जिल्ह्यात नुकतीच पिट्टीगुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलंदे यांनी एका युवकाला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यावरचे चामडीसह केस कापून जबर जखमी केल्याची घटना ताजी असताना व या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविरुद्ध जनतेत रोष असतांना पुन्हा वरोरा पोलीस कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीस जबर मारहाण करण्याचा प्रकार समोर आल्याने जनतेत पोलीस प्रशासनाविरुद्ध मोठा रोष दिसून येतं आहे.
वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गणपत ढोके नावाच्या पानठेला चालविणाऱ्या व्यक्तीस पोलीस कर्मचारी सचिन साठे. नागोसे. बनाईत. चौधरी व इतर पाच ते सहा पोलीसानी शुल्लक कारणावरून जबर मारहाण करून जबर जखमी केल्याने पोलिसांची ही गुंडगिरी जनतेत रोष निर्माण करणारी आहे. हकिगत अशी आहे की गणपत ढोके हे आपला पानठेला बंद करून रत्नमाला चौकात मित्रांसोबत काही आर्थिक व्यवहार संबंधी बहस सुरू असतांना सचिन साठे हा पोलीस कर्मचारी बिनावर्दीने त्यांच्या मधात येवून गणपत ढोके यांना शिवीगाळ करू लागला असता तू मधात कशाला आला? आम्ही मित्र आम्ही काहीही करू असे गणपत ढोके म्हणाला असता त्या पोलीस साठेनीं त्याला बेदम मारहाण केली.मात्र गणपत ढोके यांनी सुद्धा प्रतिकार केल्याने पोलीस कर्मचारी साठे यानीं तू इथेच थाम्ब मी लवकर येतो असे म्हणून अवघ्या दहा मिनिटात सात ते आठ पोलीस कर्मचारी भरून आणून पुन्हा गणपत ढोके यांना मारहाण केली व पोलीस स्टेशनमधे त्याला नेवून तिथे पान मारहाण केली.
आता हे प्रकरण आपल्या अंगलट येणार या भीतीने त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ऊलट गणपत ढोकेवरच 353.323,506,व 34 अन्वये खोटे गुन्हे दाखल करून त्याला पोलीस कस्टडीत रात्रभर ठेवले.पोलीसानीं जबर गुप्त मारल्याने गणपत ढोके हे वेदनेने अक्षरशः विव्हळत होते मात्र पोलीसानी त्याकडे दुर्लभ केले होते. दुसऱ्या दिवशी न्यायालयात त्याला सादर केल्यानंतर न्यायधिश यांनी त्याला वैद्यकीय उपचार करण्यासाठी पाठवले.आणि ते आता जिला सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार घेतं आहेत.