सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जिल्ह्यातील सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये आठ पोलीस कोरोनाबधित आढळून आलेले आहेत. या पोलिसांनी कोरोनाची दोन्ही लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस रस्त्यांवर आहेत, मात्र या पोलिसांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण ग्रहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यात पोलीस बाधित आलेले आहेत. एकाच पोलीस स्टेशन मधील आठ पोलीस कोरोनाबधित झाल्याने पोलीस दलात खळबळ उडवणारी ही बातमी आहे. कोरोना पाॅझिटीव्ह आलेले कर्मचारी यांनी टेस्ट केली होती, त्यानंतर आलेला रिपोर्टमध्ये आठ जणांचा पाॅझिटीव्ह म्हणून समावेश आलेला आहे.
एकाच पोलिस ठाण्यातील आठ पोलिस बाधित झाल्याने कर्मचाऱ्यांवर ताण आलेला आहे. सध्या कडक लाॅकडाऊनमध्ये पोलिसांवर ताण असताना आणखी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाधित आढळल्याने ताण वाढणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी दोन्ही लसीचे डोस घेवूनही पाॅझिटीव्ह आलेले आहेत.