हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. यामध्ये ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलिसांनी मदन कदम याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्या रात्री कदमसह कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. आणि या प्रकरणी आता 10 जणांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी ज्या बंदुकीतून फायरिंग झाले ती बारा बोअरची बंदुक जप्त केली आहे.
याबाबत माहिती अशी की, गौरव कदम याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, रविवारी रात्री कारची काच फोडल्याचा राग मनात धरून आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरंग जाधव यांच्यासह दहाजण घराच्या कंपाउंडमधून आत घुसले. त्यांनी वडील मदन कदम, भाऊ योगेश कदम व मला लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान माजी नगरसेवक मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रीरंग जाधव यांच्यासह अनोळखी नऊजणांचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास पाडळे करीत आहेत.
कदम यांच्याकडे होता बंदुकीचा परवाना
रविवारी रात्री जेव्हा ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने ज्या बंदुकीतून गोळीबार केला, ती बंदूक पोलिसांनी जप्त केली. त्याने झाडलेल्या गोळ्यांपैकी तीन गोळ्या श्रीरंग जाधव व सतीश सावंत यांना लागल्या. कदम याने बारा बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केला होता. तसेच ज्या बारा बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केला. त्या बंदुकीचा परवाना असल्याचेही तपासातून समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मदन कदमने झाडलेल्या तीन गोळ्या श्रीरंग जाधव व सतीश सावंत या दोघांना लागल्या आहेत. घटनास्थळावर पोलिसांना फक्त दोन पुंगळ्या आढळल्या आहेत.