सह्याद्रीवरील आंदोलनापूर्वी रयत क्रांतीचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सहकार मंत्र्यांच्या कारखाना गट ऑफिससमोर रयतची एकरकमीसाठी घोषणाबाजी केली. रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून आज बुधवारी दि. 17 रोजी ठिय्या मारण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी रयत क्रांतीचे नेते सचिन नलवडे यांच्यासह आंदोलकांना घरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतले.

रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांना पोलीस गाडीतून बनवडी येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या गट ऑफिसवर आणण्यात आले. नेते सचिन नलवडे व कार्यकर्ते गट ऑफिसवर येताच शेतकऱ्यांनी ऊसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. यावेळी रयतचे नेते सचिन नलवडे, रयतचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, राजमाचीचे सरपंच शिवाजी डूबल, बाबूराव जगदाळे, सुभाष नलवडे उपस्थित होते. यावेळी गट ऑफिसवर उपस्थित असलेले सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, शेती अधिकारी मोहन पाटील, व्ही. बी. चव्हाण, पिसाळ यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकारी चर्चा करण्याची विनंती केली. मात्र संघटनेने विनंती मान्य न करता कार्यालया बाहेरच सगळ्यांना थांबविले. यावेळी सचिन नलवडे यांनी सह्याद्री कारखान्याचा परिसर खाजगी असल्याचे सांगून सहकार मंत्र्यांच्या आदेशाने पोलिसांनी कारखान्यांवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली. आता आपण गट ऑफिसमध्ये बसू देत नाही, याचा अर्थ सह्याद्री साखर कारखाना सहकारी होता, तो खाजगी कधी पासून केला असा सवाल सचिन नलवडे यांनी उपस्थित केला.

सहकार मंत्र्यांनी सह्याद्रीचा दर संचालक बैठकीत ठरवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण सह्याद्रीच्या ऊस दर बैठकीत शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपीची बाजू लावून धरून ठराव करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे निवेदन संचालक रामचंद्र पाटील व उपस्थितांना देण्यात आले.

यावेळी बोलताना सचिन नलवडे म्हणाले, सहकार मंत्री सत्तेचा, मंत्री पदाचा गैरवापर करत आहेत. पोलिसावर दबाव टाकून जनतेसाठी असणाऱ्या पदाचा वापर स्वतः साठी करत आहेत. सरकार व सहकार मंत्री साखर उत्पादक शेतकरी सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. सह्याद्री कारखान्याच्या साखरेला निर्यातीत जास्त दर मिळाला आहे. कारखाना कर्जमुक्त आहे, रिकवरी चांगली आहे असे मंत्री सांगत आहेत. मग कोल्हापूर, सांगली सारखी एकरकमी एफआरपी देण्यास अडचण काय असा सवाल उपस्थित केला?

Leave a Comment