अश्विनी बेंद्रे हत्याकांड: माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या! बेंद्रेंच्या मुलीने केली मुख्यमंत्र्यांना पत्रातून आर्त विनवणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बेंद्रे हत्याप्रकरणी त्यांची कन्या सिद्धी गोरे हिने महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. माझ्या आईचा मृतदेह मला द्यावा अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. माझे बाबा रात्री-अपरात्री कोर्ट कामाच्या निमित्ताने मुंबईला ये-जा करत असतात आणि माझ्या बाबांना पोलीस लोकच मारतील याची मला भीती वाटत असल्याचं सिद्धी पत्रात नमूद केला आहे.

तसंच माझ्या आईच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशी द्या आणि माझ्या बाबांचे काही बरे वाईट होईल अशी भीती देखील सिध्दीने पत्रामध्ये नमूद केल आहे. अश्विनी बिद्रे यांची कन्या सिद्धीने हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले असून या पत्रात आईच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी अशी आर्त विनवणी केली आहे.

WhatsApp Image 2020-02-18 at 09.30.20

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.