कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील इदगाह मैदानच्या शेजारी चाँद पटेल वस्तीमध्ये जनावरांच्या बेकायदेशीर कत्तल खान्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. सदरची कारवाई गुरूवारी रात्रीच्या सुमारास केली. यामध्ये 31 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक फौजदार मारूती चव्हाण यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील इदगाह मैदानच्या शेजारी चाँद पटेल वस्तीमध्ये जनावरांचा कत्तल खान्यात जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पुणे येथील प्राणी मित्र संघटनेला लागली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने गुरूवारी रात्री सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तल खान्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे जनावरांचे अवशेष मिळून आले. त्याचबरोबर शेजारील शेडमध्ये लहान मोठे जरशी गाई, वासरे, खोंड असे सुमारे 31 जनावरे मिळून आली.
याबाबत पोलीस मारूती गुंडा चव्हाण यांनी शहर पोलिसात अज्ञाता विरोधात फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, सहाय्यक फौजदार मारूती चव्हाण यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करीत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा