तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे

निंभोरे (ता. फलटण) येथे तीन पानी जुगार अड्डयावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सूमारे बारा लाख आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, बारा जणांना अटक केली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार, जिल्हा दंडाधिकारी सातारा यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून स्वतः मास्कचा वापर न करता, हयगयीने, बेकदरपणे, मानवी जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून , एकत्र येऊन, तीन पानी पत्त्याचा जुगार खेळताना बबन जगन्नाथ मानकर (रा .लासुर्णे. ता. इंदापूर), दयानंद किसन गाडे (रा. शिवतारकरवाडी .ता. पुरंदर), ओंकार अरुण तपासे( रा. मल्हार पेठ सातारा), किरण एकनाथ गाडे (रा .कापूरहोळ तालुका भोर), समीर जमशेद मुलानी (रा. पिंपरद ता .फलटण), गजानन महादेव डोंबाळे (रा. डोंबाळवाडी तालुका फलटण), राजेश शेवंतीलाल शहा (रा. निंभोरे तालुका फलटण ), अनिल अंकुश यादव( रा. तरवडी लोणी काळभोर तालुका हवेली), महेश जगताप (रा.मंगळवार पेठ फलटण ), चंदन काकडे (रा .फलटण ), शरद बाळू खवळे (रा. निंभोरे तालुका फलटण), रितेश रामस्वरूप नंदा (रा .हडपसर, पुणे ) हे सर्वजण दिनांक 2 मे 2021 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिळून आल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे. सदरच्या कारवाईवेळी जुगाराचे साहित्य, पत्त्याची पाने, रोख रक्कम, दोन चार चाकी वाहने, असा एकूण बारा लाख आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे.

सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.
सदरची कारवाई सातारा येथील पोलीस अधीक्षक अजय बन्सल ,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपाधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे ,पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले ,पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख ,पोलीस उपनिरीक्षक जाधव ,सहा. पोलीस फौजदार यादव, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत काशीद, सचिन पाटोळे ,वैभव शिंदे ,शुभम चव्हाण, विशाल कोरडे ,निलेश जांभळे ,उज्वल कदम ,अनिकेत दिक्षित यांनी केली आहे.