हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे.
औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. हा कार्यक्रम सुरू असताना संबंधित परिसरात काही तरुणांनी पोलिस भरती, पोलिस भरती, अशी घोषणाबाजी त्यांनी केली. हे ऐकून शिंदे त्यांनी राज्यात साडेसात हजार पोलिस कर्मचाऱ्यांची भरती घोषणा केली. तसेच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिली. तसेच शहरातील टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 31, 2022
दरम्यान, याच कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद शहरातील टी. व्ही. सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही यावेळी केली.