सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर पाच्छापुर फाट्याजवळ आज सकाळी जत पोलिसांनी अचानक टाकलेल्या धाडीत विदेशी गोवा मेड कंपनीची दारूसह तीन लाख २४ हजार माल जप्त केला. याप्रकरणी एका अज्ञात सह तिघं जणा विरूध्द जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगली जिल्हा प्रमुख दीक्षित गेडाम व उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे , पो.को. विजय अकुल, वाहिदअली मुल्ला , सुनील वनखंडे, अमोल चव्हाण, गणेश ओलेकर, इत्यादी पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या दारूच्या चोरट्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहन ही जप्त केले आहे.
माधवनगर येथील संतोष बजरंग भंडारे व राहुल बिराजदार यांच्यासह उंटवाडी येथील एका अनोळखी इसमाचा यामध्ये समावेश आहे. विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यश गार्डन या धाब्यावर हा माल उतरवण्यात येणार होता. यामध्ये १२ हजार रुपये किमतीची दारू व तीन लाखांचे वाहन ही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे करीत आहेत.