Wednesday, October 5, 2022

Buy now

“आम्ही गप्प बसणार नाही, सडेतोड ऊत्तर देणार हेच आमच्या रक्तात” : नितेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना हटवलंच पाहिजे. ज्या दाऊद इब्राहीमने बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट रचला होता, त्या लोकांशी संबंध ठेवणाऱ्यांना हे सरकार पाठिशी घालत आहे. हे चालणार नाही, खपवून घेणार नाही. राज्य सरकारला मलिकांचा राजिनामा घ्यावाच लागेल. आम्ही गप्प बसणार नाही, सडेतोड ऊत्तर देणार हेच आमच्या रक्तात आहे,” असे राणे यांनी म्हंटले.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर भाजपने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी भाजप नेते नितेश राणे म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्ब फोडला पण सत्य काय ते सांगितले. आमच्या विरोधात मविआ सरकार कुबांड रचले जात आहे. गिरीश महाजन व स्वताला फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

वास्तविक पाहता दिशा सालियान प्रकरणात सरकार कुणाला तरी वाचवण्याच्या प्रयत्न करतंय, आमची चौकशी करून वारंवार विचारले जात आहार कि माहिती कुठून येतेय, कुणाला तरी त्रास होतोय. दिशा सालियान प्रकरणात माझ्या सोबत काय झालं हे लवकरच मी सांगणार आहे. यासाठी पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार आहे, अशी माहिती राणे यांनी म्हंटले.