लाकडी खेळण्यांच्या नावावर कुरियरणे मागवलेल्या पाच तलवारी पोलिसांनी केल्या जप्त

0
101
talwar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : अमृतसरवरून लाकडी खेळण्याच्या नावाखाली पाच तलवारी कुरियरद्वारे मागवण्याची घटना शनिवारी उघडकीस आली. इंदिरानगर बाजीपुरा येथील दानिश खान याच्या नावावर या तलवारी मागवण्यात आल्या होत्या. अमृतसरवरून कुरियरमध्ये तलवारी येत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून या तलवारी जप्त केल्या.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, पुंडलिकनगरचे सपोनि. घनश्याम सोनवणे यांना बाजीपुरा येथील इंदिरानगरच्या दानिश खान याच्या नावे हिना किराणा स्टोअर्सवर ब्ल्यू डार्ट कुरिअरने तलवारी येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून दुपारी दोन वाजेच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली स्वतः घनश्याम सोनवणे व त्यांचे सहकारी मंगेश सांगळे, बाळाराम चौरे, राजेश यदमाळ यांच्या पथकाने सापळा रचला. आणि दुपारी दोनच्या सुमारास ब्लू डार्ट कुरिअरच्या छोटा हत्ती (एमएच 20 ईजी 1107) झडती घेतली असता त्यात दानिश खान नावाचे पार्सल मिळून आले.

या पार्सल वर लाकडी खेळणी असा उल्लेख होता मात्र ते फाडून पाहिले असता त्यात पास तलवारी आढळून आल्या. यावरून रात्री दानिश खानला पोलीसांनी ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here