Monday, January 30, 2023

शेलारांच्या भेटीबाबत संजय राऊतांनी केला ‘हा’ खुलासा, म्हणाले की…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची गुप्त भेट घेतल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. येवडच नव्हे तर शेलार-राऊत यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचंही बोललं जातं होत. दरम्यान याबाबत खुद्द संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी मात्र आपण कोणाला भेटलोच नाही असं म्हणत हा दावा फेटाळून लावला.

अफवेमुळे राजकारण हलणार नाही. माझ्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. पण जेवढ्या अफवा पसरवाल तेवढं आम्ही मजबूत होऊ, माझ्यामुळे अडचणी निर्माण होणारे अशा अफवा पसरवत आहेत असा टोला संजय राऊतांनी नाव न घेता विरोधकांना लगावला.

- Advertisement -

अशा अफवा पसरवल्याने राजकारण अस्थिर होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाही. पण अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं राऊत म्हणाले. माझ्या लिखानाने कुणाला त्रास झाला असेल आणि त्यातून या अफवा आल्या असतील तर त्याचं मी स्वागत करतो, असा टोलाही त्यांनी लगावला.