सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
पुणे, विटा आणि कडेगाव तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. लोकेश रावसाहेब सुतार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३६ हजार ७६० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. माधवनगर येथे घरफोडीतील दागिने विक्रीसाठी सुतार आला असता त्याला सापळा रचून जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली कि, माधवनगर बाजारपेठ परिसरात रेकॉर्डवरील आरोपी लोकेश सुतार हा चोरीचे दागिने विक्री साठी आला आज.
मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी छापा टाकून सुतार याला ताब्यात घेतले. लोकेश सुतार याच्याकडे कसून चौकशी करता त्याने सांगितले की, सदरचे दागिणे हे वेगवेगळ्या ठिकाणावरून घरफोडी करून चोरून आणले आहेत. त्यामध्ये आठवडयापूर्वी पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापुर परिसरातून दिवसा बंद घर फोडुन चोरी केल्याचे सांगितले, पंधरा-वीस दिवसापूर्वी विटा परिसरातुन दिवसा घरफोडी व वर्षापूर्वी कडेपुर विटा मुख्य रोडलगत कॅनॉलच्या बाजुस असले बंद घर फोडुन चोरले असल्याचे सांगीतले. त्यावेळी सदर गुन्हयाबाबत माहिती घेतली असता विटा, कडेगांव आणि शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले.
सुतार याच्याकडून ७६० रुपये रोख, १ लाख ५२ हजारांचा राणीहार, ५४ हजारांचे सोन्याचे झुबे, ४९ हजारांची सोन्याची चेन, ६७ हजार ५०० रुपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मी हार, ४८ हजारांचे सोन्याचे नेकलेस, १३ हजारांचे मंगळसूत्र, १६ हजारांचे कानातील टॉप्स, ४ हजार ५०० चे सोन्याचे बदाम, १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि ४ हजार ५०० रुपयांचे कानातील डूल असा एकूण ५ लाख ३६ हजार ७६० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.




