तासगाव | राज्यभर पसरलेल्या अवैद्य धंद्याविरुद्ध कोल्हापुर क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मोहीम सुरु केली आहे. तासगाव तालुक्यातून बुधवारी पाटील यांनी या मोहिमेची सुरवात केली. यावेळी पोलिसांना आता ‘सिंघम’ होणे गरजेचे आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले. येथे लोकप्रतिनिधींच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शहर आणि तालुक्यातून अवैद्य धंदे हद्दपार करा असे आदेश यावेळी पाटील यांनी आपल्या सहकार्यांना दिले. तसेच ‘पोलिसांनी आता ‘सिंघम’ होणे गरजेचे आहे’ असे उद्गार पाटील यांनी पोलीस निरीक्षक सिंदकर यांना उद्देशून काढले.
इतर महत्वाचे –
नांगरे पाटलांनी केले भावनिक आवाहन अन हिंसक जमाव झाला स्तब्ध
पूर्व भागातील एका लोकप्रतिनिधीने सावळज पोलिस ठाण्याचा विषय मांडला. तालुक्याचा आवाका मोठा आहे. त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, पोलिस यंत्रणा प्रत्येक घटनेच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यात अडचणी येतात. त्यामुळे सावळज येथे पोलिस ठाणे मंजूर करावे, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी ‘अन्य पोलिस ठाण्यांच्या तुलनेत सर्वाधिक पोलिस तासगाव, पलूस, कुंडल या भागात आहेत. त्यामुळे पोलिस बळाची कुरकुर करू नका; अन्यथा आहे त्यातील आणखी पोलिस कमी करू’ अशी तंबी नांगरे – पाटील यांनी लोकप्रतिनिधींना दिली.