पोलिस निलंबित : सांगलीत पोलिसाचा दारू पिऊन धिंगाणा, अन्य दोघांना अटक

Sangali City Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | सांगली येथील कॉलेज कॉर्नरजवळील दुर्गामाता मंदिरजवळ पोलिस नाईक किशोर रघुनाथ कदम आणि अन्य दोन युवकांनी दारूच्या नशेत धिंगाणा घातला. रस्त्यावरील ये- जा करणाऱ्या वाहनांना अडवून आम्ही पोलिस आहे. आम्ही वाहने चेक करीत आहे, असे म्हणून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. याप्रकरणी पोलिस नाईक कदम यांला निलंबित केले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी : येथील कॉलेज कॉर्नरजवळ चालेल्या घटनेची माहीती त्यावेळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी ही माहिती सांगली शहर पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने त्याठिकाणी तातडीने धाव घेतली. त्यावेळी तिघेजण दारुच्या नशेत आरडा ओरडा करीत वाहने अडवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

दरम्यान, याप्रकरणी कदम याच्यांसह जहांगीर सलीम शेख (वय- ३४, रा. मंगळवार बाजार) आणि अझर बिलाल शेख (२६, रा. अभय नगर) या युवकांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कदम याला निलंबित केले आहे. त्या तिघांच्यामध्ये कदम हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखामध्ये काम करीत आहे.

दरम्यान पोलिसांनी तिघांचे अहवाल वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. तपासणीत त्यांनी मद्यप्राशन केल्याचे अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्या विरुध्द सांगली शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद केला. निरीक्षक सिंदकर यांनी तिघांना ताब्यात घेवून अटक केली. कदम याचा अहवाल पोलिस अधीक्षक गेडाम यांना सादर केला. त्यावर त्याचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे.