पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्त झालेले मंगलदास बांदल यांच्यावर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची वक्र दृष्टी पडली आहे. ते सध्या रांजणगाव औद्योगिक पट्ट्यात उद्योगपतींच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. त्याच्या या कृतीची त्यांना आवश्यकता का पडली तर त्याचे कारण हे की मंगलदास बांदल यांच्यावर दाखल झालेले गुन्हे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या औद्योगिक पट्ट्यात कांचत्राटे येथील स्थानिक नेते आणि टग्यांना मिळावी यासाठी उद्योगपतींना धमकावले जाते. तसेच दबाबावत घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कंपन्यांचे ठेके दिले घेतले जातात. तसेच कंपन्यांतून निघणारे क्रॅब सुद्धा उद्योगपतींनी कोणाला विकायचे याचे निर्णय हे नेते आणि हे गुंड टगे करत असतात. या चुकीच्या संस्कृतीला आला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
संदीप पाटील हे मोक्का कायद्याअंतर्गत कारवाही करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एकट्या साताऱ्यात त्यांनी २५ गुन्हे मोक्का कायद्या अंतर्गत नोंदवून १०० हुन अधिक गुंडाना जेलमध्ये डांबले होते. तर खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर देखील खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांना संदीप पाटील यांनी बिलकुल हालक्यात घेतले नाही. सध्या मंगलदास बांदल यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आणखी एक गुन्हा दाखल झाल्यास त्यांच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो. या कायद्यात गुन्हा दाखल झाल्यात आरोपीला जामीन मिळत नाही. म्हणून मंगलदास बांदल सध्या अटकपूर्व जमीन मिळवण्याच्या खटपटीत आहेत.