ईडी चौकशीमागे राजकीय हेतु ; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

0
48
Eknath Khadase
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून त्यांना याप्रकरणी ईडीकडून समन्स देण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला या प्रकरणी अटक झाल्यानंतर आज खडसेंना चौकशी साठी बोलवण्यात आलं असून त्यापूर्वी त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. ईडी चौकशी मागे राजकीय हेतू आहे असे खडसेंनी म्हंटल आहे.

मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर हि प्रक्रिया सुरु झाली असून मला यामागे कुठेतरी राजकीय वास येत आहे असं खडसेंनी म्हंटल. राजकीय हेतूने कोणीतरी हे सर्व करत आहे पण जे काही असेल ते उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे, सक्षम आहे असेही खडसे यांनी म्हंटल. हा भूखंड खाजगी असून midc ने आजही सांगावं कि आम्ही या भूखंडाचा ताबा घेतला आहे असं आव्हानही त्यांनी दिल

या प्रकरणात मला कस तरी अडकवण्यात यावं असा प्रयत्न दिसत आहे पण मुळात हा व्यवहार मी केला नसून माज्या बायकोने आणि जावयाने केला आहे. आणि खाजगी मालमत्ता म्हणून केला आहे त्यामुळे जी काय चौकशी आहे त्या चौकशीला मी तयार असून आता ईडी कार्यालयाकडे निघालो आहे असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं

काय आहे प्रकरण –

पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६ मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. त्यामुळे या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय ‘ईडी’कडून व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here