सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला पुन्हा खिंडार ; काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार नेते भाजपच्या वाटेवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उतरती काळा लागली आहे. भाजप शिवसेना राज्यात सत्तेत चांगलीच रुजले असतानाच काँग्रेस राष्ट्रवादी ज्या प्रमाणात अपयशी होत चालले आहेत. त्या प्रमाणात भाजपमध्ये अनेक नेते नव्याने सामील होत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील चार नेते नव्याने सेना भाजप मध्ये सामील होऊ इच्छित आहेत. हि काँग्रेस राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जाते आहे.

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणजित शिंदे हे आगामी विधानसभा निवडणूक भाजप कडून लढू इच्छितात. तर ते भाजप मध्ये दाखल झाल्यास बबन शिंदे निवृत्ती जाहीर करून मुलाच्या मागे आपली ताकद उभा करू शकतात. त्याच प्रमाणे रणजित शिंदे भाजपमध्ये गेल्यास त्यांचे चुलते संजय शिंदे काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष राहणार आहे.कारण संजय शिंदे राष्ट्रवादीत राहिल्यास इथे सुद्धा चुलते पुतणे लढत होऊ शकते.

भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी घेतले तुळजा भवानीचे दर्शन

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात अपहार केल्या प्रकरणी सध्या तुरुंगात असणारे रमेश कदम हे मोहोळ राखीव मधून शिवसेना पक्षा कडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना शिवसेनेने सामावून घेतल्यास राष्ट्रवादी समोर ते तुरूंगातून मोठे आव्हान ठेवू शकतात. त्यामुळे शिवसेनेत जाणार का हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील

२००९ साली माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन कॅबेनेट मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून प्रथमच विधानसभेत गेलेल्या भारत भालकेंनी २००९ ची निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यानंतर २०१४ साली त्यांनी निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढली आणि जिंकली. त्यानंतर आता त्यांना काँग्रेसमधून निवडणूक लढवणे असुरक्षित वाटू लागल्याने ते आता भाजपमध्ये जाणार आहेत असे चित्र सध्या पंढरपुरात पाहण्यास मिळणार आहे. भाजप मध्ये जाऊन निवडणूक जिंकल्यास तीन वेळा तीन वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढून जिंकण्याचे वेगळे रेकॉर्ड नोंदवले जाईल. तसेच याचबरोबर यांची वेगळी हॅट्रिक देखील नोंदवली जाईल.

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

आक्कलकोट विधानसभा मतदाररसंघाचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. तेथील त्यांचे पारंपरिक विरोधक सिद्धराम पाटील यांना शह देण्यासाठी ते भाजप मध्ये येऊ इच्छितात. तसेच ते भाजपमधून लढले नाहीत तर त्यांना पराभूत व्हावे लागू शकते म्हणूनच ते भाजप मध्ये दाखल होऊन विजय पक्का करू इच्छितात.

नवनीत राणा यांची शिवसेनेवर जळजळीत टीका

इत्तर महत्वाच्या बातम्या –

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश

आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार

आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात

राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक

Leave a Comment