संगमनेर प्रतिनिधी |अहमदनगर जिल्ह्यामधील दुसरा मतदारसंघ म्हणजे शिर्डी मतदारसंघ या मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हि सभा संगमनेर या ठिकाणी आयोजित करून कॉंग्रेसने बाळासाहेब थोरात यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. तर या कृतीतून कॉंग्रेसनेच राधाकृष्ण विखे पाटील यांना ‘चले जाव’ जाव चा इशारा दिला आहे का? का बाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगात आली आहे.
पंकजा आणि सुजय यांच्यात हे संबंध, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या असुसुत्रतेमुळे डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बाळासाहेब थोरातांनी आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केली. तसेच सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर विखे पाटील घराण्यावर जोरदारटीका करायला देखील बाळासाहेब थोरात विसरले नाहीत.
नगर दक्षिणमध्ये भाजप विजयी होण्याचा आमदार कर्डिलेंनी केला विश्वास व्यक्त
दरम्यान सुजय विखे पाटील यांनी मोठ्या नामुष्कीने कॉंग्रेस सोडली आहे हे राधा कृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. त्याच प्रमाणे कॉंग्रेस हा राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेला आहे अशी टीका देखील राधा कृष्ण विखे पाटील यांनी केली होती. या सर्व परिस्थितीत संगमनेर येथे राहुल गांधींची सभा घेणे यातून सुद्धा कॉंग्रेसचे राजकीय संकेत आहेत का? हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.
माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज