जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी
जिल्हा काँग्रेस भवनात जळगाव शहराचे काँग्रेस सरचिटणीस अजबराव पाटील यांच्या तोंडाला माजी काँग्रेस जिल्हाध्यक्षा अरुणा पाटील यांनी काळे फासल्याचा प्रकार आज सकाळी घडला. यामुळे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसअंतर्गत असलेले वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून पाटील यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले अाहे.
काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अरुणा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षांच्या नावे भीक मागो आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना अध्यक्ष पदावरून कमी करण्यात आले होते. आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अरुणा पाटील या काही समर्थकांसह काँग्रेस भवनमध्ये पोहचल्या. सरचिटणीस अजबराब पाटील यांना त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी वाद झाल्याने अजबराब पाटील यांच्यावर शाई फेकत त्यांच्या तोंडाला काळे फसण्यात आले.
शहर पोलीस ठाण्यात गर्दी
घटनेनंतर काँग्रेस पदाधिकारी आ.तांबे, जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, माजी खा.उल्हास पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, उदय पाटील, डॉ.ए.जी.भंगाळे आदींसह इतर शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यासाठी पोहचले आहेत.
‘म्हणून’ माझ्या वाट्याला वनवास – एकनाथ खडसे
या कारणामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा जोरदार विरोध
नगरमध्ये युवकाने कंटाळून दुचाकी पेटवली..कारण ऐकून थक्क व्हाल..
भाजप सरकार एकीकडे म्हणते गाईला वाचवा आणि दुसरीकडे म्हणते बाईला नाचवा – छगन भुजबळ
जळगावचा सिंघम आता अहमदनगरमध्ये