अहो शेलार! मोदींच्या जन्माआधीपासून पॅसेंजर ट्रेन सबसिडीवरच चालतात- सचिन सावंत

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा ८५ टक्के खर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा भाजपनं केला होता. मात्र, मजुरांच्या तिकिटाचे पैसे राज्य सरकार देत असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर भाजपची पंचाईत झाली. अशा वेळी राज्यातील सत्ताधारी भाजपला घरात आहेत. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मैदानात उतरत शुक्रवारी बचाव करण्याचा … Read more

आकड्यांची लपवाछपवी महाराष्ट्र नव्हे गुजरात करतं; रोहित पवारांची भाजपवर टीका

पुणे । कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत. अशा संकट काळात विरोधकांकडून केवळ राजकारण करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाबाबतचे आकडे लपवत नाही. मात्र, भाजपची सत्ता असलेले गुजरात सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी करत राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला. महाराष्ट्रात … Read more

मी मॅच्युर लिडर; उद्धव ठाकरेंना मला अपयशी ठरवायचे नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई । राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख उंचावतच असताना विरोधी पक्षीयांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आक्रमक झाले असून मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ते सडकून टीका करत आहेत. फडणवीस हे मुद्दामून सत्तेच्या हव्यासापोटी ठाकरे यांना अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका … Read more

संवेदनशून्य! श्रमिक ट्रेनध्ये झालेल्या मजुरांच्या मृत्यूला भाजपा नेता म्हणाला, ‘किरकोळ घटना’

कोलकाता ।  सोमवारपासून देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार श्रमिक विशेष ट्रेन निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेत असल्यानं, तसेच ट्रेन निश्चित ठिकाणी जाताना भरकटल्यामुळं या ट्रेनने प्रवास करणाऱ्या आतापर्यंत एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. याचसंदर्भात बोलताना भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एक वादग्रस्त … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

पुणे । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी अंत्यविधी

रायपूर । छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. १५ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विटरवर अजित जोगी याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. अजित … Read more

राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे सुतोवाच

पुणे । लॉकडाऊनमुळं राज्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे औंध ते काळेवाडी साईचौक येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्धाटन आज अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे गेले दोन ते अडीच … Read more

..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत; आव्हाडांची भाजपवर टीका

मुंबई । कोरोनाच्या संकटाच्या आडून काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत, असा थेट आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट … Read more

फडणवीसांचा ‘तो’ दावा आव्हाडांनी ठरवला खोटा, म्हणाले ‘हा’ घ्या पुरावा

मुंबई । महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सर्व खर्च राज्यानं केल्याचं म्हटलं होतं. हा सगळा वाद सुरू असताना स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून स्यू मोटू … Read more

शेतकरी, कामगार यांना सरकारने ताबडतोब १० हजार रुपये द्यावेत – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून आज देशव्यापी ‘स्पीक अप इंडिया’ हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सरकारला काही सूचना दिल्या होत्या. देशभरात कांग्रेस च्या नेत्यांनी या अभियानाला प्रतिसाद देत आपले व्हिडीओ सोशल मीडियावर विशेषतः फेसबुक ट्विटरवर शेअर केले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज … Read more