पुढील ५ वर्ष सरकारला काही धोका नाही- संजय राऊत

मुंबई । भाजप राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याची प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील 5 वर्ष सरकार मजबूत आहे. २०२५ पर्यंत कोणताही धोका अजिबात नाही. १७० आमदार आघाडी सरकारच्या बाजूने आहेत. यात वाढ … Read more

विरोधकांनी त्यांचे तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, मग कळेल; शिवसेनेची सामनातून टीका

मुंबई । कोरोना उपाययोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर असल्याचे ताशेरे एका सुनावणीत गुजरात उच्च न्यायालयाने तेथील भाजप सरकारवर ओढले. याचाच आधार घेत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राज्यातील भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन महिन्यांत जी रुग्णालये उभी केली आहेत, त्या रुग्णालयांत विरोधी … Read more

‘हा’ अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? राज ठाकरेंचा राज्यपालांना पत्रातून खणखणीत सवाल

मुंबई । राज्यातील महत्त्वाचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. मात्र, विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल आग्रही असून ‘विद्यार्थ्यांच्या … Read more

देवेंद्र फडणवीसांची तातडीची पत्रकार परिषद; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार?

मुंबई । देशभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या थैमानात महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्येमुळे हे सरकार कोरोनावर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा कडून बोलले जात आहे. नुकतेच आघाडी सरकारच्या विरोधात मेरा आंगण, मेरा रणांगण हे आंदोलन ही करण्यात आले. दरदिवशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन वळणे येत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही विरोधकांकडून केली जात … Read more

केंद्राची गुजरातवर कृपादृष्टी; महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत किती श्रमिक ट्रेन धावल्या याबाबत एक माहिती समोर आली आहे. १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून … Read more

राष्ट्रपती राजवटीची कुणकुण लागताच शरद पवार मातोश्रीवर; संजय राऊत म्हणतात..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. पवार ठाकरे भेट हि अतिशय गुप्तपणे पार पडली आणि त्यांच्यात २ तास चर्चा झाली अशी माहिती आज … Read more

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | जमावबंदीचे आदेश लागू असताना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येत नमाज पठण केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे सदस्य असणारे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावर आज पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुका आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास जिल्हाधिकारी यांनी मज्जाव केलेला आहे. दरम्यान आज … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा! राज्यपालांच्या भेटीनंतर नारायण राणेंची मागणी

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांचा राजभवनाला भेटी देण्याचा सिलसिला सुरुच आहे. आज सकाळची शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज दुपारी नारायण राणेंनी राजभवनाला हजेरी लावली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून नारायण राणे थेट प्रसार माध्यमांना सामोरे गेले. यावेळी कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही … Read more

पियुषजी, आडमुठेपणा सोडून सहकार्य करा! रेल्वेमंत्र्यांना थोरातांचा सबुरीचा सल्ला

मुंबई । स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील महाविकास आघाडीतील नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात ट्वीटर वॉर पाहायला मिळतं आहे. दरम्यान आता या ट्विटर वॉरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एंट्री मारली आहे. ”परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन रेल्वे मंत्रालय पुरवत नाही. हे … Read more

पियुषजी, राज्यसभेत तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना टोला

मुंबई । स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून सुरु झालेल्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कालपासून ट्विटर वॉर सुरु आहे. या शाब्दिक लढाईत आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर ट्विटरवर निशाणा साधला आहे. ‘पियुषजी, राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका’ असा चिमटा राऊत यांनी पियुष गोयल … Read more