बाहेर दुध, भाजीपाला मिळेल का माहीत नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल – बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई आपण सध्या कोरोना आजाराच्या तिसर्‍या टप्प्यात जात आहोत. तेव्हा पुढचे १० दिवश अतिशय महत्वाचे आहेत. बाहेर दुध, भाजीपाला मिळेल की नाही माहिती नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना बाधीतांची वाढतच चाललेली संख्या हा अतीशय गंभीर विषय … Read more

टेंशन वाढलं! देशभरात कोरोनाच्या बळींच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत १९५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशातील कोरोनाचा संसर्ग थांबायचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून आता मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाने १९५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या २४ तासांत मृत्यू होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. देशात एकूण … Read more

महसूलच हवाय तर आमदारांचे ६ महिण्याचे पगार रद्द करा; दारुची दुकाने उघडणे हा पर्याय नाही – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रील,ऑरेंज, रेड अशा तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल असेही बोलले गेले. यापार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महसूलच हवाय तर आमदारांचे ६ महिण्याचे पगार रद्द करा; दारुची दुकाने उघडणे हा पर्याय नाही … Read more

जागतिक व्यंगचित्रकार दिन: राज यांनी बाळासाहेबांना ‘गुरु’ म्हणून अशी दिली होती मानवंदना

मुंबई । व्यंगचित्रकार म्हटलं कि महाराष्ट्रात एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आपल्या ब्रशच्या फाटकाऱ्यातून कित्येकांना झोडपणारे बाळासाहेब अवघ्या महाराष्ट्रानं पहिले आहेत. बाळासाहेबांच्या याच कलागुणांचा प्रभाव ठाकरेंच्या पुढच्या पिढीतील राज ठाकरे यांच्यावर पडला. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे ह्यांच्या हाताखाली व्यंगचित्रकलेचे धडे गिरवणाऱ्या राज ठाकरेंचं १९९९ सालचं ‘चेहरे मोहरे’ हे पहिलं प्रदर्शन म्हणजे … Read more

‘देशाला एका मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज’; राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिजीत बॅनर्जींचे उत्तर

नवी दिल्ली । देश सध्या कोरोनामुळं उदभवलेल्या अर्थसंकटात सापडला आहे. उद्योग ठप्प आहेत. लॉकडाऊनमुळं रोजंदारी पोट कोट्यवधी जनता बेरोजगार झाली आहे. अशा आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी संवाद साधत आहेत. आज मंगळवारी त्यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी, आज देशाला पैशाची चिंता … Read more

रस्त्यांवर उतरुन जनजागृती करणाऱ्या ममता बॅनर्जी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा खरा आकडा का लपवतात??

सरकारमधील लोकांना त्यांच्या चुकांसाठी पाठीशी घालणे हे काम ममता बनर्जींकडून होत असून सद्यस्थितीत ते धोकादायक आहे.

चिंता वाढली! देशात २४ तासांत 195 बळी, 3 हजार 900 नवे कोरोना रुग्ण सापडले

नवी दिल्ली । लॉकडाऊन काळातही भारतातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा तेजीनं वाढताना दिसतोय. मे महिन्यात लॉकडाऊनच्या ४२ व्या (मंगळवार) दिवशीही दिसून आलेली ही वाढ लक्षणीय आहे. तर मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात करोनाने 195 जणांचा बळी घेतला असून तब्बल 3 हजार 900 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची रुग्ण संख्येतील … Read more

नरेंद्र मोदींच्या राजकीय चुकांची भरपाई राज्यांना द्यावी लागणार?

Covid -१९ ची गंमत म्हणजे मोदी सगळ्या चुकांचा दोष राज्यांना देऊन स्वतः रक्षक म्हणून बॅकफुटवरुन खेळू शकतात. संचारबंदीदरम्यान योग्य राजकीय भाषणासोबत ठाम भूमिकांचा अभाव हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.

टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने उद्योग सुरू करा – नाना पटोले

भंडारा प्रतिनिधी । टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील लहान मोठे उद्योग तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत जिल्ह्यात धान्य पुरवठा योग्य पध्दतीने करण्यात यावा तसेच पोलीस पाटील व ग्राम … Read more

धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन!

बीड प्रतिनिधी । बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी गृहमंत्री … Read more