पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कार्यालये एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील … Read more

मदतीचं बक्षीस मिळालं का ? रंजन गोगोईंच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसींची टीका

मदतीचं बक्षीस मिळालं का ? असं म्हणत माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे

महाविकास आघाडीच्या स्थगितीचा राजापूर तालुक्याला फटका

रत्नागिरी प्रतिनिधी | जनसुविधा, नागरी सुविधा व यात्रास्थळ योजनेंतर्गंत मंजूर झालेल्या अनेक कामांना महाविकास आघाडीने स्थगिती दिली आहे. राजापूर तालुक्यातील वर्क ऑर्डर नसलेल्या पंचवीस कामांना याचा फटका बसला आहे. आघाडी सरकारच्या या निर्णयाबाबत जनतेत नाराजी वाढत आहे. २०१९-२० या वर्षामध्ये जनसुविधा, नागरी सुविधा आणि यात्रास्थळ योजनेतून राजापूर तालुक्यातील ४६ कामांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठी शासनाकडून … Read more

शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का ? – सत्यजित तांबे

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश गिरे पाटील असे मृताचे नाव आहे. यांची पाच ते सहा जणांच्या टोळीने गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी … Read more

बाळासाहेब ठाकरेंनी असा अपमान कधीही सहन केला नसता : रामदास आठवले

नागपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावात ते काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी असा अपमान कधीही सहन केला नसता. उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत आले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

भारतातील १४ राज्यात कोरोनाचे ११६ रुग्ण ; अशी आहे प्रत्येक राज्यातील रुग्णांची आकडेवारी

कोरोना व्हायरसची भीती भारतातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोमवारपर्यंत  दि. १६ पर्यंत देशभरात जवळपास 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारत देणार १० मिलियन डॉलर्सची मदत- पंतप्रधान

जगभर पसरत चाललेल्या कोरोनाव्हायरस आजाराशी लढण्यासाठी आता विविध देश एकवटू लागले आहेत.

भाऊचा धक्का ते मांडवा फेरी सेवा सुरु

महाराष्ट्र सरकारने जलवाहतुकीसंदर्भातील नवीन पाऊल सध्या उचललं असून विशेष प्रस्तावानुसार भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे.

शांततेचं श्रेय जम्मू काश्मीरमधील लोकांना – अल्ताफ बुखारी

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतरही शांतता नांदण्यासाठी कुणी जास्त सहकार्य केलं असेल तर ते जम्मू काश्मीरचे लोक आहेत असं म्हणत जम्मू काश्मीरमधील नेते अल्ताफ बुखारी यांनी इथल्या लोकांचं कौतुक केलं आहे.

शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत गंभीर आरोप

मुंबई | शालेय पोषण आहार, धानखरेदी, आश्रमशाळा वस्तुखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून, विशिष्ट कंपनी, नेत्यांना फायदा मिळण्यासाठी हा संपूर्ण गैरव्यवहार केला असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुराव्यासह विधानसभेत केला. 2020-21 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर ते विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले की, शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत आहे. विशिष्ट व्यक्तींना … Read more