जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळं मराठी भाषा दिन चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची असं मत मुख्यमंत्री उद्धव … Read more

‘दिशा’ कायदा नेमका काय आहे ? घ्या जाणून

राज्यामध्ये महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी लवकरच नवीन कायदा विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत.  त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. 

दिल्ली हिंसाचार: अखेर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडत नागरिकांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना शांती कायम राखण्याच आवाहन केलं आहे. आपल्या ट्विट मध्ये मोदी म्हणाले,”दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न … Read more

सोलापूरमध्ये भाजपचे थाळीनाद आंदोलन; सरकारच्या कामावर व्यक्त केली नाराजी

सोलापूर प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी भाजपने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं आहे. ठाकरे सरकारने भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची भाषा ठाकरे सरकारने केली होती. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला … Read more

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी २६ मार्चला मतदान; भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळं राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्याचे राज्यातील राजकीय … Read more

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात साम्य तरी काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काल सोमवारी भारतात आगमन झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यासाठी आलेल्या ट्रम्प यांचे अहमदाबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत मोटेरा स्टेडियम येथे नमस्ते ट्रम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला. यावेळी आपल्यात फारच घनिष्ट मैत्री असल्याचे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींनी उपस्थित … Read more

अखेर तो क्षण आलाच! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १५ हजार लाभार्थ्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होईल अशी माहिती दिली होती. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची … Read more

‘त्या’ विधानासाठी वारीस पठाणांनी मागितली माफी पण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे तसेच समाजातील विविध … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्तानं काँग्रसनं उडवली मोदी सरकारची खिल्ली; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यासाठी गुजरातमधील अहमदाबाद आणि उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे जोरदार तयारी सुरू आहे. भारत दौऱ्यावर ट्रम्प यांच्यासमवेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इव्हांका ट्रम्प आणि सून जेरेड कुशनेर असतील. जेरेड ह्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागारही आहेत. ट्रम्प परिवाराचे स्वागत करण्यासाठी अहमदाबाद शहराची जोरदार सजावट केली जात … Read more