अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई | शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काहींना मात्र यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हि पहिली बातमी आहे. आता अशा अनेक बातम्या मिळतील असं … Read more

कुठे आहेत अच्छे दिन? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर खटला दाखल, रामदास आठवलेंचाही समावेश

रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात रांचीच्या एका वकिलाने जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. 2013 -14 च्या प्रचारात आणि भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने न पाळल्याने त्याने हा खटला दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मंत्री रामदास आठवले यांच्यावर निवडणुकीच्या रॅलीत खोटे बोलून सर्व सामान्य जनतेची … Read more

आमदारांना पगार देऊ नका, शेतकऱ्यांना मदत करा; राज्यमंत्री बच्चू कडू यांची मागणी

मुंबई : राज्यमंत्री झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून आमदार बच्चू कडू यांचं नाव चर्चेत आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी दणका देत दोन नायब तहसील अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. शेतकरी वर्ग, अपंग बांधव यांच्यासाठी बच्चू कडू नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक नवीन मागणी केली आहे. एकवेळ आमदारांना पगार देऊ नका, परंतु शेतकऱ्यांसाठी चांगल धोरण आखायला … Read more

बेरोजगारांसाठी खूशखबर ! स्टेट बँकेत ८ हजार जागांसाठी भरती

टीम हॅलो महाराष्ट्र : बेरोजगाराची समस्येने चिंताग्रस्त असणाऱ्या तरुणाईसाठी खुशखबर आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेत क्लर्क पदासाठी ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ८६५ जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर २ … Read more

काँग्रेस पाकिस्तानच्या नव्हे तर शरणार्थी लोकांच्या विरोधात – नरेंद्र मोदी

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेस पाकिस्तानच्याविरोधात नव्हे तर तिथून भारतात आलेल्या पीडित शरणार्थींच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्नाटकातील तुमकूर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

सुप्रिया सुळे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार; ‘टॉप टेन’ खासदारांत महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश

नवी दिल्ली : लोकसभेतील कामगिरीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. लोकसभेतील महत्वाच्या चर्चांमध्ये सुप्रिया सुळेंचा कायम सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कामगिरीत अजून एका विक्रमाची भर पडली आहे. खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या आहेत. लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तसेच विविध मुद्द्यांवरील चर्चेतील सहभागाबाबत ‘पीआरएस … Read more

पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आवाज उठवा; पंतप्रधान मोदींचे आंदोलन कर्त्यांना आवाहन

तुमकुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. तुमकुरु येथे श्री शिवकुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधल्या जाणाऱ्या संग्रहालयाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी भाषण केले. ते म्हणाले की, जे लोक आज भारतीय संसदेविरोधात आंदोलन करीत आहेत त्यांना मला सांगायचे आहे की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची ही कारवाई उघडकीस आणण्याची गरज आहे. जर तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर … Read more

सतेज पाटलांना मंत्रिपद मिळाल्यानं पी एन पाटील गटाने लावला नाराजीचा सूर

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झालेलं नाराजी नाट्य कोल्हापुरात देखील पाहायला मिळालं. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि पी एन पाटील यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर पक्षांने मंत्रिपदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात टाकली. यामुळं पीएन समर्थक नाराज आहेत.

बच्चू कडू यांच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे दिले होते आदेश

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल पाहिल्याच दिवशी दर्यापूर तहसील कार्याला भेट देत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत दोन तहसीलदारांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले होते. नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक प्रमोद काळे आणि सपना भोवते यांच्यावर ही कारवाई केली होती. बच्चू कडू यांच्या या निर्णयानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. … Read more

मोठी बातमी: प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही; महाराष्ट्र व बंगालचा प्रस्ताव फेटाळला

नवी दिल्ली : या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. या वर्षीच्या संचलनासाठी महाराष्ट्राने मराठी रंगभूमीची १२५ वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ पश्चिम बंगालचाही प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम … Read more