राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही; पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारला

बीड | जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. यापूर्वीच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या निवडणुकीवर भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी म्हंटले की, राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत. … Read more

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले … Read more

यशोमती ठाकूर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री ?? जिल्ह्यात जोरदार बॅनरबाजी

खरंच यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण खातं मिळालं आहे? बॅनरबाजी कितपत खरी?

अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा, शिवसेना नेत्याचे स्पष्टीकरण

औरंगाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या. हे वृत्त समजल्यानंतर सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर प्रयत्नशील होते. यावेळी अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा असल्याचे सांगत खोतकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्तार यांना भेटण्यासाठी ते हॉटेल अतिथीमध्ये गेले असता वेगळ्याच गोष्टी … Read more

लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

पुणे प्रतिनिधी | आता अशा बातम्या येत राहतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर भाजपमधील नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. यावेळी तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही … Read more

अब्दुल सत्तारांना मंत्री करुन उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला पण…

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केला पण सत्तार का … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार

नवी दिल्ली  | नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्‍यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठविले आहेत. तथापि, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू … Read more

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई | शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काहींना मात्र यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हि पहिली बातमी आहे. आता अशा अनेक बातम्या मिळतील असं … Read more

कुठे आहेत अच्छे दिन? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर खटला दाखल, रामदास आठवलेंचाही समावेश

रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात रांचीच्या एका वकिलाने जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. 2013 -14 च्या प्रचारात आणि भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने न पाळल्याने त्याने हा खटला दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मंत्री रामदास आठवले यांच्यावर निवडणुकीच्या रॅलीत खोटे बोलून सर्व सामान्य जनतेची … Read more

आमदारांना पगार देऊ नका, शेतकऱ्यांना मदत करा; राज्यमंत्री बच्चू कडू यांची मागणी

मुंबई : राज्यमंत्री झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून आमदार बच्चू कडू यांचं नाव चर्चेत आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी दणका देत दोन नायब तहसील अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. शेतकरी वर्ग, अपंग बांधव यांच्यासाठी बच्चू कडू नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक नवीन मागणी केली आहे. एकवेळ आमदारांना पगार देऊ नका, परंतु शेतकऱ्यांसाठी चांगल धोरण आखायला … Read more