खडसेंचा फडणवीसांवर थेट हल्ला बोल; म्हणाले पंकजांचा पराभव झाला नाही तर घडवला

पंकजाचा परळी मधील पराभव हा झाला नसून घडवून आणला असल्याची टीकाही खडसेंनी केली आहे. त्यामुळे पंकजांना देखाली पक्षात खूप त्रास दिला जात आहे. परंतु त्यांना बोलता येत नाही असंही खडसेंनी सांगितलं आहे. पक्षांतरावर बोलताना खडसे म्हणाले कि कितीही त्रास झाला तरी सध्या पंकजा पक्ष सोडणार नाही.

पवारांसाठी का महत्वाचा आहे १२ डिसेंबर; सांगितलं हे कारण…

यावेळी बोलताना पवारांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. तसेच १२ डिसेंबर हा दिवस त्यांच्यासाठी का महत्वाचं आहे हे सांगितले.

भाजपच्यानेतृत्वात द्वेषाची भावना; खडसेंचा पक्ष नेतृत्वावर निशाणा

दिल्ली दरबारी गेलेल्या खडसेंना पक्ष नेतृत्वाने भेट नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्या लागोपाठ भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे याचा पत्ता कुणालाही लागत नाही. 

नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित होणं हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण – नरेंद्र मोदी

नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर, विरोधात १०५ मते पडली. विधेयकावरून घूमजाव करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. सध्या या विधेयकाला बऱ्याच ठिकाणाहून तीव्र विरोध होत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ”भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्या”चे त्यांनी ट्विट मध्ये म्हणले आहे.

ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; या नेत्याला सर्वात महत्वाचं खातं

नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इत्तर कुणाकडे जाण्याचा पायंडा पडणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे याना गृह आणि नगरविकास खाते देऊन मोठा विश्वास दाखवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदेंकडून गृह खाते हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

हे विधेयक लोकसभेत मांडल्यापासूनच ईशान्य भारत धुमसत आहे. मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरून या विधेयकाचा विरोध करत आहेत. तसेच मुस्लिम समाजामधून देखील नाराजी व्यक्त होत असल्याने, या विधेयकाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

म्हणून शिवसेनेनं केला सभा त्याग; राऊतांचे स्पष्टीकरण

व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार हा प्रयत्न करत आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहेत.

पुणे जिल्ह्यामधील 750 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना सुरू; डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश

प्रभाग रचनेचे काम जलदगतीने करून 30 डिसेंबर २०१९ पर्यंत प्रभाग रचना निश्‍चित करण्यात याव्यात अशा सूचनानिवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ४०० ग्रामपंचायती आहेत. त्यापकी निम्म्या म्हणजे ७०० ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत संपणार असून, त्यांच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात अली आहे

आप्पा… गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिवशी धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

बीड | भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मोठा मेळावा होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘आप्पा, तुमचाच वारसा … Read more

पंतप्रधान मोदींनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांना दिर्घायुष्य लाभो आणि आरोग्यमय आयुष्य लाभो यासाठी मोदी यांनी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज ट्विट करुन पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशभरातून पवार … Read more