ब्रिटिशांचे खबरे आम्हाला वारसा शिकवणार का?; मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भाजपवर टीका

जयपूर | स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीतील ब्रिटिशांचे खबरे काँग्रेस पक्षाच्या वारशाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसला लक्ष करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर टीका केली. काँग्रेस पक्षाच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गेहलोत म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाचा वारसा मोठा आणि मजबूत असून तो अभिमान … Read more

झारखंडमध्ये हेमंत सोरेन पर्वाला दिमाखात सुरुवात, मित्रपक्षांची आवर्जून उपस्थिती

विशेष प्रतिनिधी | झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मदतीने स्पष्ट बहुमत मिळवलेल्या झारखंड मुक्ती मोर्चातर्फे प्रमुख नेते हेमंत सोरेन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. २०१४ साली वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी झारखंडचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान पटकावला होता. त्यांच्यासोबत आलमगीर आलम, रामेश्वर राव यांनीसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. … Read more

देशातील तरुणाईला अराजकता, घराणेशाही आवडत नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या भाषणात युवा वर्गाला संबोधित करताना ते म्हणाले की, आजच्या युवकांना अराजकता आवडत नाही. त्यांना घराणेशाही, जातीवाद आवडत नाही. चांगल्या व्यवस्थेला त्यांची पसंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2019 या वर्षाला निरोप देण्यासाठी काही क्षणच आता आपल्यासमोर राहिले आहेत. … Read more

देशात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

पुणे | देशात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे असे विधान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. ते पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या परिषदेला संबोधित करताना बोलत होते. शनिवारी 28 डिसेंबर रोजी पुण्यात ही परिषद झाली. प्रधान म्हणाले की, आज देशापुढे आव्हानं काय आहेत, एकीकडे नागरिकता मोजली जाणार की … Read more

हे अराजकतेच लक्षण, आपली वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने – भालचंद्र नेमाडे

मुंबई | सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण या कायद्याला विरोध करताना दिसत आहेत. साहित्यिक, ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी देखील नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर भाष्य केले आहे. नेमाडे यांनी म्हंटले की, हे अराजकतेच लक्षण आहे. यातून आपल्याला बाहेर पडता येणं कठीण आहे. आपल्या देशात अशी परिस्थिती … Read more

लष्करप्रमुखांनी आम्हाला राजकारण शिकवू नये – पी. चिदंबरम

तिरुवनंतपुरम | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून अनेकांमध्ये मतभेद आहेत. या कायद्यावरून राजकीय स्टंटबाजीदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच लष्करप्रमुखांनी या कायद्याविरोधात आंदोलन कर्त्यांना निशाणा केले. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सुनावले आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी स्वत:च्या कामात लक्ष … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार – मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. काँग्रेसच्या वतीने आज ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न … Read more

संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही-राजू शेट्टी

संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीवर दिली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. तसेच सरकार २१ हजार कोटींची कर्जमाफी करत असल्याचा दावाही खोटा असून कर्जमाफीची यादी जाहीर केल्यास सरकार उघडे पडेल अशी टीकाही माजी खासदार राजु शेट्टी यांनी केली. ते कोल्हापूरात बोलत होते.

शेतकरी कर्जमाफी अध्यादेशाची परभणीमध्ये होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे – सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी म्हणून दोन लाख रुपयांपर्यंत केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या अध्यादेशाच्या प्रतींची होळी करत आंदोलन केले. अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने न पाळता शेतकर्‍यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत, परभणी मध्ये आज … Read more

नरेंद्र मोदींच्या रुपाने ‘हिटलर’चा पुनर्जन्म – जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद, हॅलो महाराष्ट्र टीम – नरेंद्र मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म झाल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. औरंगाबाद येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात ते बोलत होते. आजही आसाममधील १४ लाख हिंदूंकडे कागदपत्रे नाहीत. आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक परिवारांकडे, भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, ते लोक जुने पुरावे कोठून … Read more