अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा- सचिन सावंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती. राऊत यांच्या माहितीवर सचिन सावंत यांनी काँग्रसेची भुमिका मांडत शिवसेनेला उपरोधक टोला लगावला.

स्वतः यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले की, “आम्ही पक्षीय राजकारण आणि जनप्रदर्शनासाठी मंदिरात जात नाही. आस्थेने आत्मशुद्धीसाठी ईश्वरचरणी लीन व्हावे अशी आमची भावना आहे,” अशा शब्दांत सावंत यांनी शिवसेनेला उपरोधिक टोला लगावला. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले आहे. किंबहुना माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव गांधी यांनी १९८९ सालीच हे स्पष्ट केले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत आपल्या ट्विटमध्ये ते लिहितात “अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८९ सालीच हे स्पष्ट केले होते. पण हे मंदिर कुठे व्हावे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हा विषय मिटला असल्याने कोणी कुठे जावे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

मनसेला रामराम करत धर्मा पाटलांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश; मनसेच्या तिकिटावर लढवली होती विधानसभा

निवडणुकांच्या वेळी कोणाला पराभूत करायचे हे अल्पसंख्याक ठरवतात – शरद पवार

शिवसैनिकाने जोपासला अनोखा छंद; जतन केले पंचवीस वर्षातील सामनाचे सर्व अंक

Leave a Comment