अखेर चिदंबरम यांची होणार तिहारमधून सुटका

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना २ लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उदयनराजे आणि शिंदेंची ‘तेरी मेरी यारी…’

या दोन नेत्यांच्या “दिल-दोस्ती-दुनियादारीची” चर्चा साताऱ्यात कायमच रंगलेली असते. परंतु निवडणूक लागल्या आणि यांच्या दोस्तीत काहीसा दुरावा पाहायला मिळाला. कारण पक्षनिष्ठेला वाहून घेतलेल्या शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंच्या पराभवासाठी मेहनत घेतली. तर, कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंना पाडण्यासाठी उदयनराजेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला.

भाजपा सरकार रेल्वे सुद्धा विकेल; ‘कॅग’च्या रेल्वे अहवालावरून प्रियंका गांधीची टीका  

रेल्वेच्या कामगिरीबाबत कॅगने दिलेल्या अहवालावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसची मदत घेत होते; सुमित्रा महाजन यांचा भाजपला घरचा आहेर

मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत असताना राज्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे आणि विकासाचे विषय मी उपस्थित करू शकत नव्हते. त्यावेळी मला मौन बाळगावे लागले. कारण, राज्यात माझ्याच पक्षाची अर्थात भाजपची सत्ता होती, अशी खळबळजनक खुलासा खुद्द माजी लोकसभाध्यक्ष आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केला आहे. रविवारी रात्री एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच महत्त्वाचे, विकासाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी कधीकधी मला काँग्रेसच्या नेत्यांचीच मदत घ्यावी लागत होती, अशीही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरुवात केलीच! किरीट सोमय्या यांची सरकारवर ट्विटरद्वारे टीका

राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर ट्विटरद्वारे जहरी टीका केली आहे.

‘त्या’ कागदपत्रांवर रितेश देशमुखने केला ट्विटर द्वारे खुलासा

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांचे काही कागदपत्रे सोशल मिडीया वर चांगलेच व्हायरल झाले होते. यावर सामाजिक कार्यकर्त्या मधूपूर्णिमा किश्वर यांनी कागदपत्रांचे फोटो शेअर करत ”चुकीच्या पद्धतीने ४ कोटी ७० लाख रुपयांचं कर्ज माफ करून घेतले असल्या”चे त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे सगळीकडे हा मोठा चर्चेचा विषय बनला होता. मात्र आता स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांना याबाबत खुलासा करण्यासाठी समोर यावे लागले आहे. त्यांनी ट्विट करत या सर्व आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पंकजा मुंडें बद्दलच्या ‘त्या’ सर्व अफवा – चंद्रकांत पाटील

भाजपा च्या मोठ्या नेत्या आणि माजी महीला बाल कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. पंकजा मुंडे या त्यांच्या हक्काच्या परळी मतदार संघातून विधानसभेसाठी उभ्या होत्या. मात्र त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं.

सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे देश बुडायला नको ! रोहित पवारांची ट्विटरद्वारे केंद्रावर टीका

शहरातील एका कार्यक्रमामध्ये उद्योगपती राहुल बजाज यांनी अमित शहांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याविषयी आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राहुल बजाज यांच्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे असे ते म्हणाले. तसेच सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको अशी भितीही त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे भाडे सरकारने थकवले !

देश विदेशामध्ये प्रवास करण्यासाठी नेत्यांना ‘एअर इंडिया’ तर्फे सेवा पुरवली जाते. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र आता सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

‘भाजपा’ने राज्यावर तब्बल पावणे ७ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे – नितीन राऊत

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे २ , राष्ट्रवादीचे २ आणि सेनेच्या २ आमदारांनी देखील शपथ घेतली.