राज्यात आतापर्यंत १०१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत राज्यात ६३ मतदारसंघात १०१ उमेदवारांनी १२६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे – जळगाव- दोन मतदारसंघात 2 उमेदवार, बुलढाणा- एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघात 1 उमेदवार, अमरावती- चार मतदारसंघात 5 उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, … Read more

उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील फायनल; गुरुवारी अर्ज भरणार

सातारा प्रतिनिधी | सकलेण मुलाणी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या श्री. छ. उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांचे नाव मंगळवारी सकाळी फायनल करण्यात आले. त्यानुसार श्रीनिवास पाटील आता गुरुवार दिनांक 3 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता उदयनराजे विरोधात श्रीनिवास पाटील असा चुरशीचा सामना रंगणार आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे यांच्या विरोधात कोण … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २९९ निवडणूक निरीक्षक

मुंबई, वृत्तसंस्था । विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी १३८ सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्व आय.ए.एस (इंडियन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस) दर्जाचे अधिकारी आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ … Read more

Breaking| अखेर आज झाली युतीची घोषणा ; जागा वाटपाचा सस्पेन्स कायम

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजपची युती आज झाल्याचे पत्रकाच्या मार्फत सेना भाजपच्या वतीने घोषित करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करतील असे बोलले जाते होते. मात्र युतीची घोषणा एका पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. युतीची घोषणा जरी करण्यात आली असली तरी जागा वाटपाचा सस्पेन्स दोन्ही पक्षांकडून … Read more

भव्य शक्तिप्रदर्शन करत शंकरराव गडाखांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

संभाजी भिडेंच्या प्रतिमेला शेणाचा प्रसाद ; बुद्धांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आरपीआय आक्रमक

भिडे गुरुजी यांनी एका कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भिडे गुरुजींच्या प्रतिमेला शेण लावून आंदोलन करण्यात आलं.

चुलत्या पुतण्याच्या युद्धावर शिक्कामोर्तब ! जयदत्त क्षीरसागर यांना मिळाला शिवसेना उमेदवारीचा एबी फॉर्म

मुंबई प्रतिनिधी | बीड विधानसभा चुलत्या पुतण्याच्या तुंबळ युद्धाने रंगणार हे मागील काही महिन्यापासूनच निश्चित झाले होते. याचाच एक भाग म्हणून चुलते जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेच्या उमेदवारीचा एबी फॉर्म मिळाला आहे. तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे चुलते शिवसेनकडून तर पुतण्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढणार … Read more

मोहोळमधून शिवसेनेची नवनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी ; मातोश्रीवरून एबी फॉर्म रवाना

मुंबई प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा भाजपच्या वाट्याला जाईल अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेने या मतदारसंघावर आपला हक्क सांगत हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मोहोळ मतदारसंघात नवनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. अधिकृत उमदेवार म्हणून उमेदवारी अर्जाला जोडण्यात येणारा पक्षाचा एबी फॉर्म नवनाथ क्षीरसागर यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सूत्रांनी दिली आहे. … Read more

माढा भाजपकडे : उमेदवारीसाठी गिरीश महाजन, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात गुप्त खलबत सुरु

मुंबई प्रतिनिधी |  माढा विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असल्याने युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपसाठी सोडवून घेण्यास भाजपला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गिरीश महाजन आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात या मतदार संघात नेमका कोण उमेदवार द्यायचा या दृष्टीने चर्चा गिरीश महाजन यांच्या निवासस्थळी झाली आहे. माढ्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी मोहिते पाटील आग्रही … Read more

बारामतीतून पडळकरांच्या उमेदवारीचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई प्रतिनिधी | वंचितला सोडचिठ्ठी दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडलकरांना बारामतीतून मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. गोपीचंद पडळकर वाघ आहेत. त्यांनी जंगलाचा राजा असल्या सारखे राहिले पाहिजे. गोपीचंद पडळकरांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे … Read more