प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी होणार! दाऊदच्या साथीदाराशी आर्थिक व्यवहार प्रकरण

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यावेळी ईडी चौकशीसाठी वर्णी लागली आहे ती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची. पटेल यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. ईडीच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला पटेल यांची चौकशी होणार आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यामुळं ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

“तुझी इच्छा असेल तर माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.. !!” महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आंतरजातीय लग्नाची रंजक गोष्ट

“मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव मला आवडायचा. ती कमी बोलायची. हातचं राखून बोलायची. पण तिला चांगल्या फुलांची, चांगल्या गाण्यांची आवड होती. तिच्या आणि माझी आवडीनिवडी सारख्याच होत्या. तिच्या भावाला मात्र आमचं असं एकत्र असणं पटत नव्हतं.”

या निवडणुकीत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा – स्मृति ईराणी

आपण सर्वजण दिवाळीच्या आगोदर घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे येत्या विधानसभेला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा. राष्ट्रवादीबद्दल मी बोलणार नाही कारण ”जिनका समय ही खराब हो वो दुसरों का क्या भला करेंगे’,क्योंकी उनकी घडी बंद पड चुकी है ”अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा समाचार घेतला. सांगली विधानसभा निवडणुकीसाठीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ मारुती चौक येथे घेण्यात आलेल्या जाहीरसभेत स्मृती ईराणी बोलत होत्या.

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर कुठे बिघडलं – उदयनराजे भोसले

राजकीय कोलांटउड्या मारण्यात माहीर असलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी पैसे लागतातच. आवश्यक तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध नसेल, किंवा असलेला निधी दुसऱ्या कामांसाठी वापरला जात असेल तर लग्न-समारंभासाठी गडकिल्ले भाड्याने देण्यात काहीच चुकीचं नाही असं विधान उदयनराजे यांनी केलं आहे.

जेव्हा शरद पवारांना काॅलर धरुन विधानसभेतून बाहेर काढण्यात आलेलं…

हॅलो विधानसभा | राज्याच्या राजकारणात शरद पवार हे नाव नवीन नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय संस्कारात घडलेले शरद पवार आजही त्याच जोमाने राजकारणात सक्रिय आहेत. आजही वयाच्या ७८ व्या वर्षीही पवार एखाद्या तरुणासारखं संपूर्ण महाराष्ट्र फिरतांना दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षातील एक एक नेता विरोधी पक्षात जात असतानाही पवारांमध्ये ही जिद्द कोठून … Read more

बंडखोरांवर सुटला शिवसेनेचा बाण; १४ बंडखोरांची एकाच दिवशी हकालपट्टी

शिवसेनेने सोमवारी तब्बल १४ लोकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.

अनंतकुमार हेगडे पुन्हा बरळले; ‘नोबेल’ विजेत्या अभिजीत बॅनर्जींवर केली ‘काँग्रेसधार्जिणा’ असल्याची टीका

विविध स्तरांतून बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं जात असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. तसंच बॅनर्जींना मिळालेल्या नोबेलबाबत ट्विट करताना हेगडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

उल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा

कलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

लातूर ग्रामीणमधील शिवसेनेचा उमेदवारच ‘गायब’ !! धीरज देशमुख बिनविरोध निवडून येणार?

निवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.