अनंतकुमार हेगडे पुन्हा बरळले; ‘नोबेल’ विजेत्या अभिजीत बॅनर्जींवर केली ‘काँग्रेसधार्जिणा’ असल्याची टीका

विविध स्तरांतून बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं जात असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. तसंच बॅनर्जींना मिळालेल्या नोबेलबाबत ट्विट करताना हेगडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

उल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा

कलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

लातूर ग्रामीणमधील शिवसेनेचा उमेदवारच ‘गायब’ !! धीरज देशमुख बिनविरोध निवडून येणार?

निवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.

५ वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे – नितीन गडकरी

गेल्या ५ वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिचर अजून बाकी आहे’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारात विश्वास व्यक्त केला. गडकरी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभेत भाजप उमेदवार कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? हा खरा प्रश्न आहे – शरद पवार

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. दरम्यान कन्नड येथील सभेत उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या निवडणूक प्रचारातील ३७० च्या मुद्द्यावर टीका केली. देशात कलम ३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. असे सांगत पवार यांनी आपले मत जाहीर सभेत प्रकट केले.

ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

१५ वर्षात पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? – अमित शहा

‘पंधरा वर्षात केंद्रात आणि राज्यात ‘आघाडी’ची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?’ असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना कोल्हापूरातील सभेत विचारला आहे. ”चार लाख करोड रुपयांची मदत केवळ पाच वर्षात भाजप सरकारने महाराष्ट्रला दिल्या”चे त्यांनी यावेळी नमूद केलं.

‘पेटतं पाणी’ तापवणार पनवेलची निवडणूक; टँकरच्या पाण्यावर तब्बल २९ लाख रुपये खर्च

निवडणूक प्रचारात पाण्याचा मुद्दा दुर्लक्षिला जात असल्याने पनवेल महापालिका हद्दीतील रोडपली येथील द स्प्रिंग नामक सोसायटीच्या सर्वच 325 कुटुंबांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.