मुख्यमंत्र्यांनी सातारकरांची मने जिंकली – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत आदेश द्यायचे असे वक्तव्य काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभे दरम्यान केले होते हे वक्तव्य करून 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी केलेल्या मागण्या मान्य करून सातरकरांची मने जिंकली आहेत. सातारच्या हद्दवाढीचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले होते त्या बाबत या आधी सुद्धा शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना … Read more

पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला भुजबळांची दांडी ; राजकीय चर्चाना पुन्हा उधाण

नाशिक प्रतिनिधी |  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे घोंगावते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. हे पाहता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. आता संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार हे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्याला आज (सोमवार) नाशिकमधुन सुरूवात झाली आहे. एकीकडे … Read more

अर्थमंत्री सीतारमन यांचे ‘ते’ वक्तव्य बेजबाबदारपणाचे – पृथ्वीराज चव्हाण  

पुणे प्रतिनिधी  |‘प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे’ वक्तव्य गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केलेल वक्तव्य हे बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला उबर चे नाव पुढे केले जात … Read more

म्हणून उदयनराजेंच्या प्रवेशाला पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत : मुख्यमंत्री

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील असे बोलले जात होते. परंतु मोदी उपस्थित राहिले नाहीत आणि सर्वांना चर्चेसाठी एक नवा विषयच मिळाला. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱ्यात पत्रकारांनी विचारना केली असता त्यांनी पत्रकारांना या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान हे पद … Read more

उदयनराजे म्हणतात ‘स्टाईल इज स्टाईल’, कमिटमेंट कायम राहणार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांनी भाजप प्रवेश केल्यांनतर आपली ट्रेडमार्क असलेली कॉलर उडवली नाही, त्यामुळे भाजपमध्ये गेल्यावर राजेंना लगेचच शिस्त लागली की काय अशा चर्चा साताऱ्यात रंगू लागल्या होत्या. या चर्चाना संदर्भात उदयनराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मी कधीच बेशिस्त वागत नाही, प्रत्येक व्यक्तीचा वेगळा विचार असतो. प्रत्येकाला विचार मांडण्याचा हक्क आहे. त्यामुळे कॉलर उडवणे बेशिस्त आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘स्टाईल इज स्टाईल’, ती कायम राहणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबद्दलही त्यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘मी पवारांचा आज, काल आणि उद्याही आदर करतो. कोणीही माझ्याविरोधात उभा राहू दे त्याची मला भीती नाही. असं उदयनराजे म्हणालेत.

एक बारामती आणि दुसरा कराड असे जिल्हे बनवून सातारा जिल्हा संपुष्टात आणण्याचा त्यांचा डाव होता. तो मी हाणून पाडला आहे असं म्हणत उदयनराेंनी विरोधकांवर टीका केली. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी कुठलीच कामे करण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उदयनराजे म्हणतात स्टाईल इज स्टाईल..

राष्ट्रवादीत मला काय मिळालं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दिल्ली येथे भाजप मध्ये प्रवेश केला. यानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर राष्ट्रवादीत मला काय मिळालं ठेंगा असा सवाल उपस्थित करत भोसले यांनी आपण जनतेच्या भल्यासाठी भाजपात गेलो असल्याचं सांगितले.

शेवटी सहनशिलता असते. एक – दोन नव्हे तब्बल पंधरा वर्षांत मला काहीच मिळालं नाही. ज्यांनी वीस वीस वर्ष पदं उपभोगली ते गेले सोडून आणि मी का जाऊ नये असे म्हणत जर भाजपात जाऊन जनतेची कामे होणार असतील तर का जाऊ नये असा प्रतिप्रश्न भोसले यांनी केलाय.

मतदार संघाचा विकास करणे हे माझं मुख्य उद्दीष्ट आहे. तो आत्तापर्यंत झाला असता तर आज ही वेळ आली नसती असंही उदयनराजे यांनी यावेळी म्हटलंय.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्‍या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

काँग्रेसची मोठी खेळी; साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण रिंगणात?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबरोबर साताऱ्याची पोटनिवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश … Read more

आ.थोरांताविरोधात इंदुरीकर महाराज निवडणूक लढविणार ?

संगमनेर |येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज निवडणूक रिंगणात उतरणार अशी दबक्या आवाज चर्चा होती. मात्र आज शुक्रवारी संगमनेर येथील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने इंदुरीकर महाराज थोरातांविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज रिंगणात उतरणार या दबक्या आवाजातील … Read more

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणुक लागणार असल्याची शक्यता आहे. ही निवडणुक रंगतदार होणार असल्याची सोशल मिडीयावर आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. उदयनराजें विरोधात सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण … Read more

भारतात येडा पंतप्रधान बसलाय – प्रकाश आंबेडकर

जालना प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचा येडा पंतप्रधान असा उल्लेख करत टीका केली आहे. जालना येथे बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

सध्या आरएसएसवाले एक टीआरपी खूप वापरतात तो म्हणजे मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन टाळी दिल्याचा. पण ट्रम्पने मोदीला दिलेल्या एका टाळीची किंमत भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोजावी लागणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. चीन आणि अमेरिकेत व्यापारी युद्ध सुरु असून चीन आता अमेरिकेचा कापूस घेणार नसल्याचं पक्क आहे. अशात अमेरिका तो कापूस भारताला देइल आणि भारतातील कापूस उत्पासकांचे नुकसान होईल असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मोदींना लोकप्रियतेची चटक आहे. अमेरिकेसारखे देश याचा फायदा घेऊन त्यांचा व्यापार आपल्या देशात वाढवत आहेत. यासर्वाचा फटका इथल्या शेतकर्‍यांना बसणार आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=SjcKU-JeGQ8&w=560&h=315]