देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत ; संजय राऊतांनी सांगितलं गुप्त बैठकी मागचं सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आणि आता राज्यात नवीन समिकरण होतंय की काय अशी शंका उपस्थित झाली होती. आता या भेटीमागे काय कारण होतं ते समोर आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: फडणवीस भेटीमागील कारण स्पष्टपणे सांगितलं आहे.

‘देवेंद्र फडणीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नव्हते. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे भेट घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे. फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा साहित्यिक संस्थानी आग्रह केला आहे, असंही राऊत यांनी सांगितले.

सामना’च्या मुलाखतीसाठी देवेंद्र फडणीस यांना बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. शनिवारी आम्ही भेटल्यानंतर गप्पा मारल्या त्यानंतर आम्ही एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे शत्रू नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment