परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
केंद्रातील सरकार हे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारं सरकार असून, लोकांची फसवणूक करत असल्याची घणाघाती टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. लोकसभा उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, शरद पवार यांनी परभणी मध्ये आघाडीतील घटक पक्ष्यांची राजेश विटेकरांचा उमेदवारी भरताना एकत्रित सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
केंद्रातील मोदी सरकार हे लोकांची फसवणूक करत असून, शेतकरी आणि जनता आता ट्रस्ट झाली आहे. ना खाऊगा ना खाणे दुगा अस म्हणणारे मोदी, राफेल सौंदयाच्या किमतीबद्दल काय बोलत नाहीत. 350 कोटीवरून किंमत 1670 वर गेली. देशात सरकारी मालकीच्या विमान बनविणाऱ्या तीन कंपन्या असताना, रिलायन्स ला काँट्रॅ्क्ट कसे मिळते यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
केंद्रातील सरकार सैनिकांच्या प्रश्नावर राजकारण करत असून, अभिनंदनला 56 ईचीच्या छातीने सोडून आणले. परंतु आंतरराष्ट्रीय करारामुळे अभिनंदन सुखरूप मायदेशी आले. जर ते म्हणत असलेलं खर असेल तर, कुलभूषण जाधव तीन वर्षापासून पाकिस्तानच्या जेलमध्ये खितपत असताना, 56 इंच छाती 10 इंचावर का येते असा सवाल पवार यांनी विचारला.
यावेळी आ .जयंत पाटील , आ . राजेश टोपे , आ . बाबाजानी दुर्राणी, लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर,आ . मधुसुदन केंद्रे, मा. राज्यमंत्री . सुरेश वरपुडकर , मा .आ . सुरेश देशमुख, आ . विजय भांबळे यांची उपस्थीती होती. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी दळणार यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. दरम्यान आज शिवसेना पक्षाने नेही शक्ती प्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केला .आदीत्य ठाकरे मात्र न आल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले .