नरेंद्र मोदींची अकलूज येथील सभा रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे अकलूजला पार पडणार आहे. हि सभा १७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार मिळाला नाही म्हणून भाजपने लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंना उमेदवारी दिली. या उमेदवाराला जनता नाकारणार आहे. सोलापूरमध्ये खरी लढत हि सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात होणार आहे. सोलापुरात १८ एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळे १७ तारखेला अकलूज मध्ये सभा घेणे योग्य राहणार नाही असे राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी म्हणले आहे. या मागणीचे पत्र देखील त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी आज याच संदर्भात स्मरण पत्र जिल्हाधिकार्यांना दिले आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आहे.

जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांना कसलाही जनाधार नाही. त्यांना जनता निवडणुकीत नाकारणार आहे. त्यामुळे सोलापूर येथील मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून नरेंद्र मोदी यांची  सभा रद्द करण्यात यावी अशी मागणी दीपक साळुंखे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra 

महत्वाच्या बातम्या 

सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर म्हणतात…..

प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

पर्रीकरांवर पवारांनी केलेल्या विधानाचे मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

धक्कादायक! शिवसेनेला मत देऊ नका अशी चिठ्ठी लिहून शेतकर्‍यांची आत्महत्या

येत्या २३ एप्रिलला आपल्या घड्याळासमोरचं बटन दाबा : रणजितसिंह मोहिते पाटील

Leave a Comment