गृहमंत्री अमित शाह यांचा दुसरा कोरोना चाचणी अहवाल आला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमद्ये उपचार सुरु होते. त्यानंतर आता त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेण्यात आली. अमित शाह यांनी स्वतः आपल्या कोरोना चाचणीचा अहवालाबाबत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

अमित शाह यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. याचसोबत मेदांता हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही शाह यांनी आभार मानले आहेत. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शाह मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment