चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे
सलग ४ वेळा भाजपा कडून खासदार असलेल्या हंसराज अहीर यांच्याविषयी एन्टीइन्कमबंसी फॅक्टर मोठा आहे. परंतु, त्यांच्याविरोधात काँग्रेसला तगडा उमेदवार मिळत नसल्याने दरवेळी भाजपाचे फावते. पण यावेळी वामनराव चटप यांनी काँग्रेस कडून लोकसभा लढवावी, यासाठी काँग्रेस हायकमाण्डने त्यांच्याकडे आग्रह धरला होता. पण त्यांनी यावेळी लोकसभा निवडणुक न लढविण्याचा निर्धार केला आणि शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर, युवा नेते आशीष देशमुख यांची नावे आता काँग्रेसकडून चर्चेत आहेत.
निवडून येण्यासाठी उमेदवाराला किमान ५ लाखाहुन अधिक मताधिक्य लागते. परंतु, स्वबळावर काँग्रेस ३ लाख मतदान मिळवू शकेल. मागच्या लोकसभेत मोदी लाटेतसुद्धा वामनराव चटप यांना २ लाखाहुन अधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळी वामनराव चटप लढणार नसतील तरी त्यांना लोकसभा क्षेत्रात माननारा मतदार मोठा आहे. तेव्हा, या लोकसभेत वामनराव नेमकी काय भूमिका घेतात त्यावर येणारा खासदार ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांमुळे बाळू धानोरकर यांचा लोकसभेचा पत्ता कट…
हंसराज अहिर यांच्या विरोधात काँग्रेसकडून हे तीन उमेदवार शर्यतीत?