शेतकरी मोर्चात अशांतता निर्माण करणारे राजकिय पक्षांचे लोक; शेतकर्‍याची प्रतिमा मलिन करण्याचा कट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शेतकरी मोर्चात अशांतता निर्माण करणारे राजकिय पक्षांचे लोक आहेत असा आरोप शेतकरी नेते राकेश टिकैट यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनाला मलिन करण्याचा कट काहीजणांनी रचला आहे. आंदोलनात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या लोकांना आम्ही ओळखतो. काही राजकीय पक्षांचे लोक आंदोलनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं वक्तव्य टिकैट यांनी केले आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हातातून निसटत आहे असा आरोप आपल्यावर केला जातोय असा प्रश्न विचारला असता राकेश टिकैट यांनी हा राजकिय पक्षांचा कट असल्याचे म्हटले आहे. आज दिल्लीतील लाल किल्ल्यात काही शेतकर्यांनी प्रवेश करुन आपला झेंडा फडकवला. यामुळे आता शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण लागले असल्याचे दिसत आहे.