ठाणे प्रतिनिधी । राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी. अशी मागणी करत ठाण्यात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टात राफेल बाबत कोर्टानं निकाल दिल्यानंतर राहुल गांधींच्या चौकीदार चोर है याविधायावरून भाजपने पुन्हा एकदा राजकारण तापवलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राफेल डील प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली त्यानंतर तिला योग्य ठरवले आहे. खरेदी प्रक्रियेची देखील तपासणी करीत ती देखील योग्य ठरवली आहे. तसेच ऑफसेट प्रक्रियाही योग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या यापूर्वीच्या निर्णयाचा हवाला देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर संबोधले होते. मात्र, हे सर्वांत मोठं खोटं होतं हे आता सुप्रीम कोर्टात सिद्ध झालं. त्यामुळं आता राहूल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने आता पुन्हा एकदा सांगितले की, राफेल लढाऊ विमानाच्या गुणांबाबत कोणतीही शंका नाही. जेव्हा सुप्रीम कोर्टात हे हारले तेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीत हा मुख्य मुद्दा बनवला. तसेच नरेंद्र मोदींना कोर्टाने चोर म्हटल्याचे जनतेला खोटे सांगितले. परदेशातही भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशाची माफी मागायला हवी अशी मागणी आता अनेक स्तरातून होत आहे.