अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात
अहमदनगर येथे पोलीस वसाहतीत राहणार्या पोलीस कर्मचार्याच्या मुलीचा वीजेचा शाॅक लागून मृत्यू झालाय. अहमदनगर पोलीस मुख्यालयात सदर घटना घडल्यानं एकच खळबळ उडालीय.
हाती अालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासूब नगर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावलीय. यामुळे घरावरील पत्रे व भिंतींत करंट उतरला होता. वसाहतीत राहणाऱ्या पोलिसाची मुलगी पूजा सुनील कुरहे हीला भींतीला शाॅक लागला. MBA चे शिक्षण घेणार्या पुजाला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात पुजाला पोस्टमार्टमसाठी आणण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण पोलिस मुख्यालयात शोककळा पसरली होती.
चार दिवसापूर्वी एमएससीबी कडे तक्रार करूनही दुरुस्ती झाली नव्हती. एमेसिबी कडे तक्रार करूनही त्यांनी वेळेवर लक्ष न दिल्याने ही घटना घडल्याचं समोर येतंय. एमेसिबी बद्दल येथील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.